कोल्हापूर दि. २१.
इतिहास संशोधक व मोडी लिप्यातरकार श्री अशोक मानकर लिखित पावनखिंडीचे सत्य व टाक्यावरची पोटं या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे राजर्षी शाहू सभागृह येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार माननीय जयंत आसगावकर होते तर अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री आर वाय पाटील होते.
आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री मानकर सर यांनी आपल्या लिखित असणाऱ्या पुस्तकाविषयी कथन केले तर अध्यक्षीय भाषणात आसगावकर सर यांनी ही पुस्तके निश्चितच शिक्षक,विद्यार्थी व तरुणांना प्रेरणादायी आहेत असे गौरव उदगार काढले.
यावेळी साहित्यकार बाबुराव शिरसाट, डॉ. सचिन कोंडेकर, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणधीर मोरे, जि प सदस्य संयोगिता मोरे, मुख्याध्यापक टी. जी. गायकवाड सर, ग्रामीण कथाकार दत्ता परीट सर, यंत्र अभियंता सुकन्या मानकर व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते.
उपस्थितांचे आभार सुकन्या मानकर यांनी मानले.
( छायाचित्रात डावीकडून -सचिन कोंडेकर, साहित्यकार बाबुराव शिरसाट, माजी मुख्याध्यापक टी.जी. गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे सेक्रेटरी आर वाय पाटील, लेखक अशोक मानकर, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, रणधीर मोरे, संयोगिता मोरे जिल्हा परिषद सदस्य, श्रीमती मुक्ताबाई मानकर, अनिता मानकर व ग्रामीण कथाकार दत्ता परीट)

Post a Comment
0 Comments