Type Here to Get Search Results !

No title

 *न्यू इंग्लिश स्कूल, पोर्ले येथे निवडणूक प्रक्रिया संपन्न*

कोल्हापूर, दि. १८.

 न्यू इंग्लिश स्कूल पोर्ले तर्फ ठाणे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या माध्यमिक शाळेत लोकशाहीचा पाया असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेची विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधीची निवड लोकशाही मार्गाने करून मतदान प्रक्रिया कशी असते ती विद्यार्थ्यांना वास्तवात अनुभवयास मिळाली. 


 या प्रक्रियेत उमेदवारांचे अर्ज भरण्यापासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व टप्पे सामावून घेऊन विद्यार्थ्यांना मतदानात प्रक्रियेची ओळख करून देण्यात आली.या निवडणूकीत पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होते. या प्रक्रियेत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रेम राजू लोहार  तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून उत्कर्षा सागर घाटगे  यांची निवड झाली.


 या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रेमलता धांडोरे यांनी तर केंद्राध्यक्ष म्हणून श्रीकांत झेंडे सर व इतर शिक्षकांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले.

Post a Comment

0 Comments