कोल्हापूर जिल्ह्यात व धरण क्षेत्रामध्ये पाउस सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
जिल्ह्यातील राधानगरी धरण ८० टक्के तर वारणा धरण ८२ टक्के भरल्याने नद्यांना पूर येऊन कोल्हापूर शहराला महापुराचा धोका उद्भवू शकतो.या संततधार वृष्टीमुळे जिल्ह्यातील ११ मार्ग बंद झाले असून ८ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतुकीवर परिणाम झालेला आहे.
जिल्ह्यातील चित्री, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्पनाला, धामणी, गोदे , जंगमहट्टी ही आठ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
Post a Comment
0 Comments