अनौपचारिक व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वरिष्ठ विद्यार्थी जर कनिष्ठ विद्यार्थ्यांना त्रास देत असतील व तसे निदर्शनास आल्यास अशा ग्रुप वर लक्ष ठेवण्याचे निर्देश युजीसी ने उच्च शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. अशा प्रकारच्या ग्रुपमध्ये होणाऱ्या त्रासाला रॅगिंग मानले जाईल व रॅगिंग विरोधी कायदया अंतर्गत संबंधित शैक्षणिक संस्था विरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही आपल्या नवीन रॅगिंग प्रतिबंधक दिशादर्शक सूचनामध्ये म्हटले आहे.
दरवर्षी नवीन विद्यार्थ्याकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने अशा प्रकारच्या सूचना संस्थाना दिल्या आहेत.
Post a Comment
0 Comments