कोतोली (पोलीस न्युज नेटवर्क): कोतोली (ता. पन्हाळा )येथील नेहरू विद्या मंदिरचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री निवृत्ती धांडोरे यांच्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवापूर्ती पश्चात त्यांचा सपत्नीक सत्कार व शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्री सागर कांबळे सर यांनी केले.
कार्यक्रमात प्रथम सत्कारमूर्ती श्री निवृत्ती धांडोरे यांचा सत्कार माजी प्राचार्य श्री. डी. जी. पाटील सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तर सौ.प्रेमलता धांडोरे यांना माजी पर्यवेक्षिका सौ. यु. एस. मांजरेकर मॅडम यांनी साडी व श्रीफळ देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री. डी. जी. पाटील, माजी पर्यवेक्षिका सौ .यु.एस मांजरेकर,मुख्याध्यापक श्री पोर्लेकर, श्री सुरेश लोहार यांनी मनोगत व्यक्त केले तर सौ. एस. एस. पोवार मॅडम यांनी आपल्या खास काव्यात्मक शैलीतून मनोगत व्यक्त करून भावी जीवन कार्य व आरोग्यास शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे सौ धांडोरे,कुमारी आलिशा व यश यांनी आपले मते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
निरोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमास सर्व निवृत्त जेष्ठ सहकारी,शिक्षक व इतर कर्मचारी हजर होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. वाय. के पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले
Post a Comment
0 Comments